कर्तव्य फाऊंडेशन | जाहीर सभा वृत्तांत | 23 फेब्रुवारी 2020

Standard

आदर्श विद्यामंदिर भुईबावडा विद्यालयाची माजी विद्यार्थी संघटना – कर्तव्य फाऊंडेशनची वार्षिक सभा शारदाश्रम विद्यालय, दादर मुंबई येथे पार पडली.
🙏🙏🙏🙏🏾🙏🙏🙏
कर्तव्य फाऊंडेशनच्या वार्षिक सभेला वेळात वेळ काढून उपस्थित राहीलेल्या सर्व सभासद व माजी विद्यार्थ्यांचे खूप खूप आभार…
आजच्या सभेत विषयानुसार चर्चा करून काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले ,त्या बद्दल उपस्थित सर्वाचे मनापासून धन्यवाद….!!!!
———————————-
■ सभेचा वृत्तांत

● सूत्रसंचालन – सभेचे सूत्रसंचालन सचिव श्री. सत्यवान मोरे यांनी केले.

● आर्थिक अहवाल- सन 2018/19 चा वार्षिक आर्थिक ताळेबंद अहवाल खजिनदार श्री. प्रकाश मोरे यांनी वाचून दाखविला.

● आर्टस् , काॅमर्स कॉलेज संदर्भात माहिती- श्री. गणेश पावले यांनी कॉमर्स कॉलेजची स्थापना व कॉमर्स कॉलेजच्या आर्थिक नियोजनाविषयी सखोल माहिती दिली. आणि आर्ट्स कॉलेजची आपल्यावर आलेली जबाबदारी याची माहिती दिली.

● सभासदांची वार्षिक वर्गणी – सभासदांची वार्षिक 365/- रुपये वर्गणी कशी जमा करता येईल यावर स्वर्वानी चर्चा केली. व थकीत असलेली वर्गणी जमा करण्यासाठी समिती नेमण्यात आली.

● नविन कार्यकारी कमिटी निवडी बाबत- कर्तव्य फाऊंडेशनची सध्याची कार्यकारणी समिती 5 वर्षांचा कालावधी पूर्ण होत असल्याने बरखास्त करावी असा प्रस्ताव मांडण्यात आला. यावर सविस्तर चर्चा करून सध्याची कमिटी कायम ठेवताना त्यात बदल करून अजून 7 ते 8 पदाधिकारी वाढवून त्यामध्ये गावचेही असावेत, त्यांना कामे वाटून द्यावीत असा प्रस्ताव पास झाला.

श्री सुशांत मोरे यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना कार्यकारिणीच्या कामाची पद्दत, शिस्त व कार्यकालाविषयी सखोल मार्गदर्शन केले.

● पुढील सभा- कर्तव्य फाऊंडेशन पुढील सभा येत्या मार्च महिन्यात शिमगोत्सवात गावी आयोजित करण्यात यावी असे सर्वानुमते ठरवण्यात आले आहे. त्यानुसार लवकरच माहिती देण्यात आली.

अध्यक्ष श्री. संतोष ह. मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. अध्यक्षांनी आपल्या भाषणात कर्तव्य फाऊंडेशनला मिळालेली सर्व सभासदांची साथ व घेतलेले परिश्रम यामुळेच आपण यशस्वी असल्याचे नमूद केले.

पुन्हा एकदा सर्व उपस्थित सभासदांचे मनःपूर्वक आभार..

आपले
कर्तव्य🌿फाऊंडेशन(ट्रस्ट)
माजी विद्यार्थी संघटना, भुईबावडा पंचक्रोशी

सभेची क्षणचित्रे

दहावीचा निकाल – २०१८-१९

Standard

आदर्श विद्यामंदीर भुईबावडा दहावीचा निकाल 94.44 इतका लागला. तसेच नव्याने सुरू झालेल्या कॉमर्स कॉलेज शाखेचा निकाल यावर्षी १००% लागला असून आर्ट्स शाखेचा निकाल ९६.६६% इतका लागला आहे.
विशेष म्हणजे विनाअनुदानित कॉमर्स कॉलेजसाठी शाळेची माजी विद्यार्थी संघटना कर्तव्य फाऊंडेशन आणि त्यांना भुईबावडा ग्रामस्थांनी दिलेली साथ याच फलित आज निकालाच्या रूपाने पहायला मिळाले.
कर्तव्य फाऊंडेशन माजी विद्यार्थी संघटना ही संस्था शाळेसाठी जीवनदायिनी, नवसंजीवनीच ठरली आहे. भुईबावडा पंचक्रोशीतील शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळा डिजिटल केली. त्यानंतर गेल्यावर्षी कॉमर्स कॉलेज सुरू केले. कॉलेजच्या पहिल्याच वर्षीचा निकाल १००% लागला.
भुईबावडा पंचक्रोशीतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहु नये म्हणून आर्ट्स बरोबरच कॉमर्स कॉलेजची स्थापना करण्यात आली. माफक प्रवेश शुल्क आकारले. प्रसंगी काही विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क कर्तव्य फाऊंडेशनने भरले व हा प्रवास सुरु केला. संपूर्ण पंचक्रोशीत आज कर्तव्य फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक होत आहे. “विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास हाच एक ध्यास” हे आपले ब्रीदवाक्य कर्तव्य फाऊंडेशन तंतोतंत पाळत आहे. त्यांच्या माध्यमातून उभी राहिलेली ही चळवळ भुईबावडा पंचक्रोशीत नक्कीच शैक्षणिक क्रांती घडवेल.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..!

कॉमर्स आणि आर्ट्स कॉलेज निकाल इयत्ता बारावी – २०१९

Standard

सर्वाना कळविण्यात आनंद होतो की, आपल्या नव्याने सुरू झालेल्या कॉमर्स कॉलेज शाखेचा निकाल १००% लागला असून आर्ट्स शाखेचा निकाल ९६.६६% इतका लाभला.
विशेष म्हणजे कॉमर्स कॉलेजसाठी शिक्षक, कर्तव्य फाऊंडेशन आणि भुईबावडा ग्रामस्थांनी दिलेली साथ याच फलित आज आपल्याला निकालाच्या रूपाने लाभले आहे.
हे यश असेच अबाधीत राखत येणाऱ्या वर्षात सर्वानी जोमाने कामाला लागू…

कॉमर्स शाखेसाठी लाभलेले सर्व देणगीदार व हितचिंतक या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन..!

■ कॉमर्स कॉलेज- 100% निकाल

कु. भाग्यश्री कदम – 73.53% – प्रथम
कु. प्रज्ञा विचारे- 72.30% – द्वितीय
कु. स्नेहा गुरव – 71.53% – तृतीय

■ आर्ट्स कॉलेज – 96.66% निकाल

कु. सुजलशा तळेकर – 78.76% – प्रथम
कु. सोनाली कांबळे – 69.69%- द्वितीय
कु. सिद्धी गुरव – 66.15% – तृतीय

आपले
कर्तव्य फाऊंडेशन
चळवळ शैक्षणिक परिवर्तनाची

हितगुज मेळावा व पुस्तक प्रकाशन सोहळा २०१९

Standard

■ कर्तव्य फाऊंडेशन आयोजित विद्यार्थी हितगुज मेळावा २०१९ व तू घे भरारी पाखरा” या चौथ्या अंकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शेकडो विद्यार्थ्यांनी दर्शवला सहभाग ■
——————————————————–
कर्तव्य फाऊंडेशन आयोजित विद्यार्थी हितगुज मेळावा व तू घे भरारी पाखरा या अंकाचा प्रकाशन सोहळा भुईबावडा येथील आदर्श विद्यामंदिर व तात्यासो मो. स. मोरे कनिष्ठ महाविद्यालय कॉमर्स आणि आर्ट्स येथे पार पडला. इयत्ता दहावी भुईबावडा परीक्षा केंद्रातील शेकडो विद्यार्थ्यांनी या हितगुज मेळाव्यात सहभाग घेतला.
इयत्ता दहावीनंतर आपले विद्यार्थी कॉलेज जीवनात प्रवेश करणार आहेत. दहावीच्या परीक्षेचे व निकालाचा भार, मनावरील दबाव नाहीसा करण्यासाठी. व परीक्षेनंतर लागणाऱ्या निकालाला सामोरे जाण्यास ध्येर्य देण्यासाठी या मेळाव्याच आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेच्या युगात गुणांना खूप महत्व आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही अशा वेळी खचून न जाता भविष्यातील तयारी कशी करावी. मिळालेल्या गुणांचे योग्य मूल्यमापन करून पुढील ध्येय कसे गाठावे? यासाठी या विद्यार्थी हितगुज मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री घरपणकरसर, भुईबावडा पंचक्रोशीतील शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मनोहर मोरे, श्री. सुनिल दळी, श्री. बाजीराव मोरे, श्री. दिनेश मोरे, श्री. रवींद्र मोरे, पत्रकार स्वप्निल कदम, कु. पूजा पाटणकर व भुईबावडा ग्रामस्थ उपस्थित होते.
तू घे भरारी पाखरा या अंकाची ई-आवृत्ती लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे.

कॉमर्स कॉलेजची स्वप्नपूर्ती

Standard

आपणां सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की, भुईबावडा पंचक्रोशीच्या शैक्षणिक विकासासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याने कॉमर्स कॉलेज आपल्या शाळेत सुरू केले.
भुईबावडा ग्रामस्थ, शिक्षकवृंद आणि कर्तव्य फाऊंडेशन टीमने यासाठी गेले दिड वर्ष विशेषतः गेला एक महिना अतोनात प्रयत्न करून ही मान्यता मिळवली.

भुईबावडा ग्रामस्थ,शिक्षक आणि कर्तव्य फाऊंडेशन यांनी घेतलेल्या मेहनतीचे चीज आज झाले. ग्रामस्थांचे लाभलेले प्रोत्साहन आणि त्यांनी खंबीर पणे दिलेली साथ या आत्मविश्वासाच्या जोरावरच हे बहुमूल्य कार्य सिद्धीस गेले.

कर्तव्य फाऊंडेशनचे सर्व सभासद, हीतचिंतक, भुईबावडा ग्रामस्थ व शिक्षकवृंद आपल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन
💐💐💐💐💐💐💐

आपले
कर्तव्य🌿फाऊंडेशन
एक शैक्षणिक चळवळ

विद्यार्थी हितगुज मेळावा मार्च २०१८

Standard

कर्तव्य फाऊंडेशन आयोजित विद्यार्थी हितगुज मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
शेकडो विद्यार्थ्यांनी दर्शवला सहभाग*
——————————————————–

कर्तव्य फाऊंडेशन आयोजित विद्यार्थी हितगुज मेळावा नुकताच भुईबावडा येथील आदर्श विद्यामंदिर व तात्यासो मो. स. मोरे कनिष्ठ महाविद्यालय कॉमर्स आणि आर्ट्स येथे पार पडला. इयत्ता दहावी भुईबावडा परीक्षा केंद्रातील शेकडो विद्यार्थ्यांनी या हितगुज मेळाव्यात सहभाग घेतला.
इयत्ता दहावीनंतर आपले विद्यार्थी कॉलेज जीवनात प्रवेश करणार आहेत. दहावीच्या परीक्षेचे व निकालाचा भार, मनावरील दबाव नाहीसा करण्यासाठी. व परीक्षेनंतर लागणाऱ्या निकालाला सामोरे जाण्यास ध्येर्य देण्यासाठी या मेळाव्याच आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेच्या युगात गुणांना खूप महत्व आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही अशा वेळी खचून न जाता भविष्यातील तयारी कशी करावी. मिळालेल्या गुणांचे योग्य मूल्यमापन करून पुढील ध्येय कसे गाठावे? यासाठी या विद्यार्थी हितगुज मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उंबर्डे शाळेचे मुख्याध्यापक श्री ढगे सर या महिनाअखेर सेवानिवृत्त होणार असल्याकारणाने त्यांना गौरविण्यात आले. कर्तव्य फाऊंडेशनच्या शैक्षणिक कार्यात श्री ढगे सरांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले होते.
यावेळी भुईबावडा शाळेचे मुख्याध्यापक श्री. एम. डी. साबळे सर, उंबर्डे शाळेचे मुख्याध्यापक श्री. ढगे सर, कर्तव्य फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. संतोष ह. मोरे, खजिनदार श्री. प्रकाश विष्णू मोरे, श्री. सुनिल दळी, श्री. संतोष डी. मोरे, श्री. किशोर मोरे, श्री. रविंद्र मोरे, श्री. राजेश मोरे, श्री. अनंत मोरे, श्री, श्रीधर मोरे, श्री. बबन पांचाळ, श्री. संदीप मोरे व भुईबावडा पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठया उपस्थित होते.

कार्यकाल – सप्टेंबर २०१५ ते नोव्हेंबर २०१७

Standard

​मित्रहो,

      कर्तव्य🌿फाऊंडेशन स्थापन होऊन दोन वर्षे झाली. आपण सर्वांनी भरभरून साथ दिली. वेळोवेळी सहकार्य करताना शाळेचे हित प्रथम मानून तन, मन, धन अर्पण केलेत. सर्वजण कर्मवीरांनी घालून दिलेल्या आदर्शाला जागलात याचा नेहमीच आनंद होतो.

       सन २०१५ ते २०१७ या दोन शैक्षणिक वर्षात आपण बरेच उपक्रम राबवले. दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या पुस्तकात त्या उपक्रमांचा आढावा व आर्थिक अहवाल आपण प्रकाशित केला. तो आपणा पर्यंत पोहचलाच असेल.

        आपला प्रत्येक उपक्रम आम्ही कमीत कमी खर्चात, जास्तीत जास्त बचत कशी होईल याचे नियोजन करून करतो. आपण दिलेली वार्षिक वर्गणी ३६५/- रुपये व आजीवन सभासद वर्गणी ५०००/- रुपये यातून उभा राहिलेला निधी या उपक्रमांसाठी वापरण्यात आला आहे.

       आपल्या आधुनिक शिक्षणाच्या ध्यासाने विद्यार्थी गुणवत्तेत भर पडतेय हे गेल्या वर्षीचा शाळेचा निकाल पाहता लक्षात येतेय.

■ कॉमर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांना एकमिशन फी म्हणून प्रत्येकी २०००/- रुपये मदत आपण केली. तसेच ■ आपला विद्यार्थी हा कॉम्प्युटर जिनियस असावा. त्याला MS-CIT शिकता यावी यासाठी प्रत्येकी २०००/- रुपये मदत* आपण करत आहोत.
      गेल्या दोन वर्षातील महत्वाच्या कामाचा तपशील तक्त्यात देण्यात आला आहे. याशिवाय वेळोवेळी सभा, ग्रामस्थ-माजी विद्यार्थी भेटीगाठी, रयत शिक्षण संस्थेच्या अधिकारयांच्या भेटी इत्यादी. कामे आपल्याकडून करण्यात येतात.

         आपली लाभलेली साथ व सहकार्य असेच निरंतर, अखंड राहो, भुईबावडा पंचक्रोशीतील विद्यार्थी शैक्षणिक दृष्टीने सक्षम होवो हीच इच्छा..! व हेच आपले कर्तव्य..

■ कार्यकाल – सप्टेंबर २०१७ ते नोव्हेंबर २०१७

नोव्हेंबर २०१७ – MS-CIT शिकण्यासाठी प्रत्येकी २०००/- रु. मदत

नोव्हेंबर २०१७ – कॉमर्स कॉलेज संदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली

नोव्हेंबर २०१७ – अभिनय प्रशिक्षण वर्ग (तीन दिवस)

ऑक्टोबर २०१७ – अभिनय प्रशिक्षण वर्ग (तीन दिवस)

सप्टेंबर २०१७ – तू घे भरारी पाखरा – तृतीय अंक प्रकाशित 

सप्टेंबर २०१७ – निबंध, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, गायन स्पर्धा

सप्टेंबर २०१७ – विद्यार्थी गुणगौरव

ऑगस्ट २०१७ – पालक डिजिटल ओळख

ऑगस्ट २०१७ – भुईबावडा ग्रामस्थ सभा

ऑगस्ट २०१७ – इयत्ता आठवी डिजिटल क्लासरूम

जुलै २०१७ – कॉमर्स कॉलेज ऍडमिशन प्रत्येकी २०००/- रु. मदत

जुलै २०१७ – कॉमर्स कॉलेज संदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली

जून २०१७ – प्रा. तुकाराम चव्हाण सर ENGLISH GRAMMAR प्रशिक्षण शिबीर व पुस्तक वाटप.

जून २०१७ – पंचक्रोशीतील पालक-विद्यार्थी भेटीगाठी

जून २०१७ – करियर मार्गदर्शन शिबीर

मे २०१७ – संपूर्ण तालुक्यात कॉमर्स कॉलेज जाहिरात

मार्च २०१७ – विद्यार्थी हितगुज मेळावा

जानेवारी २०१७ – परीक्षेची पूर्वतयारी मार्गदर्शन शिबीर

सप्टेंबर २०१६ – तू घे भरारी पाखरा – द्वितीय अंक प्रकाशित 

सप्टेंबर २०१६ – निबंध, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, गायन स्पर्धा

सप्टेंबर २०१६ – विद्यार्थी गुणगौरव

जून २०१६ – वृक्षारोपण शिबीर

जून २०१६ – इयत्ता नववी, दहावी डिजिटल क्लासरूम

मे २०१६ – पटसंख्या वाढीसाठी शाळेच्या जाहिरातीचे फलक लावले

एप्रिल २०१६ – भुईबावडा ग्रामस्थ प्रथम सभा

मार्च २०१६ – मुंबई माजी विद्यार्थी प्रथम सभा

फेब्रुवारी २०१६ – तू घे भरारी पाखरा – प्रथम अंक प्रकाशित 

डिसेंबर २०१५ – इंग्रजी विषयी मार्गदर्शन

सप्टेंबर २०१५ – विद्यार्थी गुणगौरव

सप्टेंबर २०१५ – निबंध, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, गायन स्पर्धा

——————————————–

अधिक माहितीसाठी व सभासद नोंदणीसाठी संपर्क –

 9619943637, 9322894687, 8369359929
धन्यवाद!
               आपले 

    कर्तव्य🌿फाऊंडेशन(ट्रस्ट)

(चळवळ शैक्षणिक परिवर्तनाची)

————————————-

[टीप : हा मेसेज व वरील फोटो आपल्या भुईबावडा पंचक्रोशीतील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा. जेणेकरून प्रत्येक जण कर्तव्य फाऊंडेशनच्या शैक्षणिक कार्यात सामिल होईल.]

​विद्यार्थी गुणगौरव व पुस्तक प्रकाशन सोहळा – २०१७

Standard

विद्यार्थी गुणगौरव व पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

————————–

        कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३०व्या जयंतीनिमित्त आपल्या आदर्श विद्यामंदिर व मो. स. मोरे कनिष्ठ महाविद्यालय, आर्ट्स व कॉमर्स, भुईबावडा येथे विद्यार्थी गुणगौरव व पुस्तक प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

       कर्मवीर आण्णांच्या जयंतीनिमित्त शाळेत निबंध, वक्तृत्व, रांगोळी, प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्या स्पर्धेत एकूण ४५ विद्यार्थी विजयी झाले होते या सर्व विद्यार्थ्यांना कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

         तसेच गतवर्षी इयत्ता दहावी व बारावी च्या बोर्ड परीक्षेत प्रथम तीन क्रमांकानी पास झालेल्या सहा विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कुसुर येथील प्रा. राजेंद्र पाटील व कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून भुईबावडा गावच्या सरपंच सौ. श्रेया मोरे उपस्थित होत्या. त्याचबरोबर व्यापीठावर  भुईबावडा गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री. तानाजीराव मोरे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री. बाजीराव मोरे, माजी सभापती श्री दिपक पांचाळ साहेब, श्री. तात्यासो मोरे, श्री. मनोहर भास्कर मोरे, कर्तव्य फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री. संतोष मोरे, अभिनेते श्री. संतोष तेली, श्री. गणेश मोरे, श्री गणेश पावले, श्री. अरविंद मोरे, श्री. रमेश मोरे उपस्थित होते.

काही क्षणचित्रे –